Wednesday, March 16, 2011

दादोजी कोंडदेवांचे शिवाजी महाराजांच्या जिवनातील महत्व

आदिलशाच्या हुकमावरुन आदिलशाही सरदारांनी पुण्याची मसणट केली.शहाजीराजांचा पुणे परगणा लुटुन,जाळुन उध्वस्त केला.शहरे,गावे ओसाड पडली होती.शेतीभाती ओस पडली होती . कुणाचा पायपोस कुणामध्ये नव्हता.स्वताः शहाजीराजेच निजामशाही अन स्वताःच्या अस्तित्वासाठी धडपडत होते.अश्यावेळी पुंड-गुंडांचे फावते.पुंड पाळेगार लुटारुंच्या धाडी तर सारख्या कोसळत. अशी परिस्थिती साधारण १६३५ च्या सुमारास शहाजीराजांच्या पुणे परगण्याची झाली होती.मोगल अन अदिलशहाने निजामशाही बुडविली.या दोघांनाहि शहाजीराजांच्या शौर्याची,कर्तुत्वाची, धाडसाची,मुत्सद्देगिरीची चांगलीच जाणीव झाली होती.शहाजीराजे इथे संह्याद्रीजवळ राहिले तर संह्याद्रीच्या मदतीने पुन्हा पुन्हा बंड करतील हे लक्षात घेउन त्यांनी शहाजीराजांना सह्याद्रीपासुन दूर कर्नाटकामध्ये पाठविले.उध्वस्त पुणे परगण्याच्या व्यवस्थेसाठी जिजाऊसाहेबांबरोबर बाल शिवबाराजांना पाठविण्याचे शहाजीराजांनी ठरविले.हा बेवसाऊ परगाणा पुन्हा वसाऊ करणे हे सोपे काम नव्हते!शहाजीराजांनी आपला अगदी विश्वासु नोकर दादोजी कोंडदेव यांना पुणे आणि बाजुच्या ३६ खेड्यांच्या जहागिरीचे कारभारी म्हणुन
नेमुन त्यांना मतुश्री जुजाऊसाहेब अन बाल शिवबाराजे यांच्याबरोबर पुण्याला पाठविले. दादोजी कोंडदेव हे अदिलशहाचे कोंडणा किल्य्याचे सुभेदारहि होते( म्हणजे अदिलशहाहि दादोजींचे कर्तुत्व माहिती होते) हे सर्व जेंव्हा पुण्याला आले तेव्हा पुणे कसब्यातील शहाजीराजे भोसलेंचे रहाते वाडेहि जमिनदोस्त झाले होते.पुण्यात वाडा बांधायचे नक्की केले,तो पर्यंतपुण्याच्या दक्षिणेला असलेल्या खेडेबारे येथील बापुजी मुदगल न~हेकर देशपांडे यांच्या वाड्यात रहाण्याचे ठरले.
शहाजी राजांच्या नोकरीत मुख्य कारभारी म्हणून काम करताना दादोजींना वतनांसंबंधीच्या निरनिराळ्या तंट्यांचे निवाडे करावे लागत.निवाडे बाल शिवाजीराजांच्या सदरेवरच करीत असत.दादोजी कोंडदेव मुद्दाम बाल शिवाजीराजांच्या उपस्थितीमध्ये निवाडे करीत असत.गोतसभेत दादोजींच्या उपस्थितीत झालेल्या अशा अनेक निवाड्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत.दादोजी कोंडदेवांनी उजाड झालेला मुलूख पुन्हा लागवडीखाली आणला अशा आशयाचा अनेक कागदपत्रांमध्ये उल्लेख आलेला आहे.जहागिरीला लागुन भयंकर जंगल होते,या जंगलामधुन अनेक रानटी श्वापदे शेतीचे नुकसान करीत असत.दादोजींनी या जंग़ली श्वापदांचा बंदोबस्त करुन शेतक~याना दिलसा दिला.
जंगली श्वापदांप्रमाणे मावळामध्ये गुंड-पुंडाची पुंडाई मोडुन काढण्याचे आवघड काम दादोजींना करावे लागले. मावळ खो~यात शेकडो वर्षापासुन मावळे देशमुखांची घराणी नांदत होती. अवघड डोंगरी मुलुखामुळे ही मंडळी बेगुमान,बेशिस्त झाली होती. एकमेकांची वतने,खोरी शेजारच्या खो~याला भिडलेले ! म्हणून या देशमुखांमधील बलदंड,आडदांड असा देशमुख इतरांची वतने हडपण्याचा प्रयत्न करी.शेजारच्या खो~यांवर हल्ले करुन धन,धान्य,गुरे,जनावरे पळविणे असे उध्योग चालत. आपल्या वतनाचा विस्तार करण्यासाठी परस्परांचे खून, मारामा~या,मानापमान,सूड,छुपे हल्ले असे प्रकार चालत.छुप्या हल्ल्यामधील यांचा आवडीचा प्रकार म्हणजे लग्नाच्या वरातीवर हल्ला करुन लग्नाचे व~हाड कापून काढणे !बळी तो कान पिळी हा इथला न्याय होता.शहाजीराजांच्या जहागिरीची,म्हणजेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची निट व्यवस्था लावण्यासाठी या पुंड,आडदांड देशमुख वतनदारांची पुंडाई बंद करुन त्यांना एका सुत्रामध्ये गोवून त्यांच्या शक्तीचा व कर्तृत्वाचा स्वराज्यासाठी उपयोग करुन घेण्याचे अवघड काम दादोंजींपुढे होते. वर्षानुवर्षे स्वच्छंदपणे सार्वभौमपणे वागणारी ही बेदरकार देशमुख मंडळी दादोजींच्या हुकुमामध्ये वागणे हे दुष्कर कर्म होते. म्हणुन दादोजींनी एक एक वतनदार देशमुखाला साम,दाम,दंड,भेद या सर्व मार्गाने जरब बसविणे सुरु केले. रामाजी चोरगेला ठार मारले. फुलाजी नाईक शिळमकराला बांबूने ठोकुन सरळ केले.पण सर्वांत अवघढ काम होते कृष्णाजी नाईक बांदलांचे !मलीक अंबरच्या काळापासुन हा कृष्णाजी नाईक बांदल हिरडस व अजुबाजुच्या मावळात पुंडावा करीत होता.जबरदस्तीने बारा मावळात वसुली करत होता.एकदा तर त्यानी दादोजी कोंडदेबांच्या घोड्याच्या शेपटीच कापली!मग दादोजींनी त्याला भेटीला सिंहगडावर बोलावले. (दादोजी सिंहगडाचे अदिलशहाचे सुभेदार होते)त्याला पुंडावा बंद करण्यास समजावले,पण तो मानीना .मग त्याला गोणीमध्ये घातले,नानाप्रकारी हाल केले व अखेर त्याचा चौरंगा केला,म्हणजे त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडले.कृष्णाजी सारख्या बलदंड पुंडाची ही अवस्था पाहुन सगळी मावळे चपापली!यानंतरच ख~या अर्थाने बारा मावळांवर बाल शिवाजी महाराजांची सत्ता प्रस्थापित झाली.
मी हे सर्व इतक्या विस्ताराने या साठी लिहितो आहे की ही जहागीरी सुधारणे म्हणजे शुन्यातुन विश्वच निर्माण करायचे होते हे लक्षात यावे.अन हे अव्हान जिजाआईसाहेब अन दादोजी कोंडदेवांनी उचलले.यामधुनच ७ वर्षाच्या बाल शिवाजीराजांची डोळस जडणघडण होत होती.
दादोजी यांचे निर्णय योग्य,रास्तच असतील असा भरवसा खुद्द शिवाजी
महाराजांनाही वाटते असे अनेक समकालीन कागदपत्रांवरुब दिसते.उदाहरणार्थ
मावळचा सुभेदार महादाजी सामराजयाने कर्यात तरफेचा हवालदार महादाजी नरस
प्रभू यांना पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ चे एक पत्र उपलब्ध आहे.त्यात
शिवाजी महाराजांनी महादाजी सामराजांस पाठविलेले एक पत्र उदघृत केले
आहे..." साहेब (म्हणजे शिवाजी महाराज)कोणाला नवे करु देत नाही ,दादोजी
कोंडदेवाच्या कारकीर्दीत चालत आले असेल ते खरे !" असे शिवाजी
अहाराजांच्या त्या पत्रात म्हतले आहे.पुणे परगण्याच्या नीरथडी तर्फेतील
परिंचे या गावच्या पाटीलकी विषयी
शिवाजी महाराजांनी नीरथडी तर्फेचा हवालदार तानाजी जनार्दन याला पाठविलेले
२६ जुन १६७१ चे एक पत्र उपलब्ध आहे.या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात
"वैकुंठवासी साहेबांचे (म्हणजे शहाजी राज्यांचे)व दादोजी पंतांचे
कारकीर्दीस चालिले ते करार आहे,तेणे प्रमाणे चालवणे,नवा कथला करु न
देणे." पुणे परगण्याच्या क~हेपठार तरफेतील वणपुरी या गांवच्या
पाटीलकीवरुन झालेल्या तंट्याविषयी एक पत्र २३ जुलै १६७१चे एक पत्र उपलब्ध
आहे.त्यात लिहीले आहे की "मागे दादोजी कोंडदेदे यांचे कारकीर्दीस ऐसे
चालिले असेली,राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालेले असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे,जो न वर्ते त्यास ताकीत करणे" असा हुकुम राजश्री साहेबी
(म्हणजे शिवाजी महाराजांनी) केला असल्याचे नमुद केले आहे. मावळांतील मुठे
या गांवच्या पाटीलकी विषयी एक नवा तंटा सुरु झाला होता.त्याविषयीशिवाजी
महाराजांनी देशाधिकारी कान्होरे रुद्र याला पाठविलेले १ नोव्हेंबर१६७८ या
तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे.त्यापत्रातहि " दादोजी कोंददेव यांचे वेळेस
चालिले असे तेणेप्रमाणे शिवचरित्रसाहित्य,खंड ३ मधील ३९९ व्या लेखकांत पुरंदर किल्ल्याची हकिकत आली आहे.त्यामध्ये शिवाजी महाराजांनी पुरंदरचे किल्लेदार महादाजी निळकंठराव यांना असे लिहीले आहे की " दादोजी कोंडदेव आम्हाजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते.ते मृत्यु पावले,आता आम्ही निराश्रित जहालो."दादोजी कोंडदेवाच्या म्रुत्यूनंतर शिवाजी महाराजांनी पाठविलेल्या अनेक पत्रांमध्ये "दादोजी कोंडदेव् सुभेदार यांना देवादन्या झाली" असा आदरयुक्त उल्लेख आला आहे.
या सर्व गोष्टींचा विचार केला तर दादोजी कोंडदेवांचे जे स्थान आपल्या नजरेसमोर येते ते शिवाजी महाराजांच्या गुरुचेच येते. शहाजीराज्यांनी अनेक शिक्षकांची नेमणुक शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी केली होती. कोणत्या शिक्षकांच्या म्रुत्युसमयी महाराजांनी" आता आम्ही निराश्रित झालो" असे लिहिल्याचे दाखऊन ध्यावे.फक्त दादोजी कोंडदेवाच्या मृत्युमुळे " आम्ही आता निरश्रित जहालो" असे कां लिहीले? इतर शिक्षक होते,दादोजी गुरु होते हेच यामुळे दिसुन येते.